Ad will apear here
Next
झटपट बनवा
नवनवीन पदार्थ करण्याची हौस अनेक महिलांना असते. कमी वेळात, कमी खर्चात रुचकर पदार्थ तयार करणे हे कोणाला नको असते? अशा पदार्थांच्या कृती प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे यांनी ‘झटपट बनवा’ पुस्तकामधून दिल्या आहेत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून हे पदार्थ तयार होणारे आहेत. उपवासाच्या विभागात फ्रूट पंच, तुळशीच्या बियांचे सरबत, विविध फळांचे रस, कुल्फी, आइस्क्रीम अशा गारेगार पदार्थांसह लोणची, चटण्या, सार, कोशिंबीर, उपवासाच्या भाज्या, पोळ्या, भाकऱ्या, पुऱ्या, थालीपीठ, वडे व भजी, डोसा, इडली, पॅटीस, कटलेट, चिवडा, शेव, गोडाचे पदार्थ आदींचा समावेश आहे. इतर पदार्थांमध्ये ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या, कुरडईचा चिवडा, औषधी लोणचे, शेंगोळे, भरली भाकरी, आंबोळी, काकडीचे पातोळे, मूग-मटार सामोसे, चवळीचे मुठीये, कोबीच्या वड्या, तिखी भाकरी, खाकऱ्याचा भुगा, रोटला, राजस्थानी गट्टे, झुणझुण्या, तिकडीमाँ, पंचमेळ डाळ, तांदळाच्या पिठाची कडबोळी, उपरपेंडी, पेंडवटण, हुरड्याची उसळ, फणसाचे काप, राधा बल्लवी अशा वैविध्यपूर्ण पदार्थांच्या पाककृतींचा समावेश आहे.

पुस्तक : झटपट बनवा

लेखिका : प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे

प्रकाशक : सुकृत प्रकाशन, पुणे

पृष्ठे : ११८

मूल्य : १६० रुपये

(‘झटपट बनवा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZUVBZ
Similar Posts
‘जीवनतारे’वरची कसरत..! चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाचा संदीप चव्हाण यांनी करून दिलेला परिचय...
खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली : ‘खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे’, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले
‘रोज खा तीस ग्रॅम बदाम’ पुणे : ‘‘किंग ऑफ नट्स’ म्हणून ओळखला जाणारा बदाम म्हणजे सुक्यामेव्यातील एक बहुगुणी घटक आहे. बदामामध्ये ई जीवनसत्व, मॅग्नेशियम, डायेटरी फायबर, प्रथिने अशा एकूण १५ प्रकारच्या पोषकतत्वांचा समृद्ध साठा आहे. त्यामुळे बदाम खाणे हा निरोगी आयुष्य जगू इच्छिणाऱ्यांसाठी राजमार्ग आहे. रोज तीस ग्रॅम बदाम खाणे अत्यंत
रिदम वाघोलीकर यांना ‘वर्ड स्मिथ ऑफ इयर’ पुरस्कार मुंबई : संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर, तसेच तृतीयपंथी गौरी सावंत यांच्यावर लेखन करणारे युवा लेखक रिदम वाघोलीकर यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र अचिव्हर्स अॅवॉर्डस्’च्या ‘वर्ड स्मिथ ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेता राजकुमार राव आणि संजना गलरानी यांच्या हस्ते वाघोलीकार यांना हा पुरस्कार देण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language